भारतीय महिला संघाने जिंकली वन डे मालिका
इंग्लंडमध्ये भारतीय महिलांचा सलग दुसऱ्या मालिकेत विजय
हरमनप्रीत कौरचे शतक, तर क्रांती गौडच्या सहा विकेट्स निर्णायक
Women in Blue make history on English soil : भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये इतिहास रचला. त्यांनी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये सलग दोन मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात हरमनप्रीत कौरच्या ( Harmanpreet Kaur) या संघाने १३ धावांनी इंग्लंडच्या महिला संघाला पराभूत केले आणि मालिका २-१ ने खिशात घातली. यापूर्वी पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ असा विजय मिळवला होता. भारताच्या ३१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला ३०५ धावांवर समाधान मानावे लागले. क्रांती गौडने ( Kranti Goud) सहा विकेट्स घेतल्या.