India Women Cricket Team:
India Women Cricket Team:sakal

BAN W vs IND W: बांगलादेशविरुद्ध टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! WPL गाजवणाऱ्या दोन खेळाडूंची पहिल्यांदाच संघात निवड

India Women Cricket Team: बांगलादेश दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करणार आली आहे.

India Women Cricket squad: भारतीय महिला क्रिकेट संघ एप्रिलच्या अखेरीस बांगलादेश दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे आहे, तर उपकर्णधारपद स्मृती मानधनाकडे आहे.

भारतीय महिला टी20 संघात सजीवन सजना आणि आशा शोभना यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. या दोघींनीही वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.

सजना मुंबई इंडियन्सचा भाग होती. तिने तिच्याकडे असलेल्या आक्रमक फलंदाजीच्या कौशल्याची चुणूक या स्पर्धेत दाखवली होती.

India Women Cricket Team:
RCB vs SRH: तब्बल 22 सिक्स अन् 10 फोर! बेंगळुरूच्या मैदानात हैदराबादने रचले विक्रमांचे मनोरे, एकदा नजर टाकाच

आशाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना चमक दाखवली होती. ती वूमन्स प्रीमियर लीगमध्ये 5 विकेट्स घेणारी पहिली भारतीय क्रिकेटपटूही ठरली होती. या स्पर्धेत तिने 12 विकेट्स घेत आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

दरम्यान, या मालिकेला पाठीच्या दुखापतीमुळे जेमिमाह रोड्रिग्सला मुकावे लागणार आहे. ती सध्या बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आहे.

अष्टपैलू क्रिकेटपटू दयालन हेमलता आणि राधा यादव यांचे मात्र संघात पुनरागमन झाले आहे. हेमलताचे सप्टेंबर 2022 नंतर, तर राधाचे मार्च 2023 नंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

India Women Cricket Team:
Travis Head IPL Century: बेंगळुरूत घोंगावलं हेडचं वादळ! चौकार-षटकारांची बरसात करत झळकावलं सर्वात वेगवान शतक

याशिवाय संघात दिप्ती शर्मासह श्रेयंका पाटील सायका इशाक, रेणूका सिंह ठाकूर, तितास साधू, पुजा वस्त्राकर, अमनजोत कौर या गोलंदाजही आहेत.

तथापि, मिन्नू मनी, कनिका अहुजा आणि मन्नत कश्यप यांना मात्र संघात जागा मिळालेली नाही.

भारतीय संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, सजना सजीवन, ऋचा घोष (यष्टीरक्षक), यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, सायका इशाक , आशा शोभना, रेणुका सिंह ठाकूर, तीतस साधू.

भारतीय महिला संघाच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक (टी20 मालिका)

  • 28 एप्रिल - पहिला टी20 सामना, सिल्हेट (संध्या. 6 वाजता)

  • 30 एप्रिल - दुसरा टी20 सामना, सिल्हेट (संध्या. 6 वाजता)

  • 2 मे - तिसरा टी20 सामना, सिल्हेट (दु. 1.30 वाजता)

  • 6 मे - चौथा टी20 सामना, सिल्हेट (दु. 1.30 वाजता)

  • 9 मे - पाचवा टी20 सामना, सिल्हेट (संध्या. 6 वाजता)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com