RCB vs SRH: तब्बल 22 सिक्स अन् 10 फोर! बेंगळुरूच्या मैदानात हैदराबादने रचले विक्रमांचे मनोरे, एकदा नजर टाकाच

Sunrisers Hyderabad IPL Records: सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या आयपीएल सामन्यात 20 षटकात 287 धावा उभारत अनेक विक्रम केले आहेत.
RCB vs SRH | IPL 2024
RCB vs SRH | IPL 2024Sakal

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 30 वा सामना सोमवारी (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 287 धावा केल्या. यासह बेंगळुरूसमोर 288 धावांचे आव्हान ठेवले.

हैदराबादच्या फलंदाजांनी 20 षटकात 287 धावा उभारताना मिळून 19 चौकार आणि 22 षटकार ठोकले. यासह हैदराबादने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. या आयपीएल इतिहासातील एका डावात संघाने उभारलेल्या सर्वोच्च धावा ठरल्या आहेत.

यापूर्वीही हा विक्रम हैदराबादच्या नावावर होता. हैदराबादने याच हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावा केल्या होत्या.

RCB vs SRH | IPL 2024
Travis Head IPL Century: बेंगळुरूत घोंगावलं हेडचं वादळ! चौकार-षटकारांची बरसात करत झळकावलं सर्वात वेगवान शतक

आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या

  • 287/3 - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू; बेंगळुरू, 2024

  • 277/3 - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स; हैदराबाद, 2024

  • 272/7 - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स; विशाखापट्टणम 2024

  • 263/5 - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया; बेंगळुरू, 2013

  • 257/7 - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स; मोहाली 2023

टी20 मधील सर्वोच्च धावसंख्या

  • 314/3 - नेपाळ विरुद्ध मंगोलिया; हांगझोऊ 2023

  • 287/3 - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू; बेंगळुरू, 2024

  • 278/3 - अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड; डेहराडून, 2019

  • 278/4 - झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की; इल्फोव्ह काउंटी 2019

  • 277/3 - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स; हैदराबाद, 2024

एका आयपीएल डावात सर्वाधिक षटकार

  • 22 षटकार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू; बेंगळुरू, 2024

  • 21 षटकार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया; बेंगळुरू, 2013

  • 20 षटकार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात लायन्स; बेंगळुरू, 2016

  • 20 षटकार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात लायन्स; दिल्ली, 2017

  • 20 षटकार - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ; हैदराबाद, 2024

RCB vs SRH | IPL 2024
Derek Underwood: क्रिकेटविश्वात शोककळा! 3000 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गज फिरकीपटूचे निधन

हेडचं शतक, तर क्लासेनचं अर्धशतक

या सामन्यात हैदराबादकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 41 चेंडूत सर्वोच्च 102 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याच्याबरोबर हेन्रिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 7 षटकार ठोकले.

या दोघांव्यतिरिक्त अभिषेक शर्मा (34), एडेन मार्करम (32) आणि अब्दुल सामद (37) यांनीही मोलाचे योगदान दिले. त्यामुळे हैदराबादला एवढी मोठी धावसंख्या उभी करणे शक्य झाले.

बेंगळुरूकडून गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स घेतल्या, तर रिस टोप्लीने १ विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com