

India Women vs Australia Women
Sakal
India Women tour of Australia full Schedule & Live Telecast Details: वनडे वर्ल्ड कप विजेता भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला रविवारपासून (१५ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२०, वनडे आणि कसोटी सामने खेळायचे आहेत. वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा (India's Women Team) हा पहिलाच परदेशी दौरा आहे.
याशिवाय या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाची स्टार यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेली क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे, त्यामुळे या दौऱ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. हेली भारताविरुद्ध टी२० मालिका खेळणार नसली, तरी ती वनडे आणि कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी सामन्यानंतर ती निवृत्ती घेईल. त्यामुळे सध्या भारताविरुद्ध वनडे आणि कसोटीत ती नेतृत्वही करताना दिसेल.