
India Women U19 vs Sri Lanka Women U19: भारतीय मुलींनी १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करताना Super 6 मधील जागा निश्चित केली. भारतीय पोरींनी वेस्ट इंडिजविरुद्ध २६ चेंडूंत, तर मलेशियाविरुद्ध १७ चेंडूत विजय मिळवला होता. आज भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद ११८ धावा केल्या आणि त्यानंतर श्रीलंकेला गुंडाळून आणखी एक दणदणीत विजय मिळवला.