
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे आणि २० जूनपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. पण, इंग्लंड दौऱ्यावर दाखल होणारा हा एकमेव संघ नाही, तर यानंतर भारताचा १९ वर्षांखालील मुलांचा संघ, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघ आणि मिश्र दिव्यांग संघही इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. पण, या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारताचा धक्का बसला आहे आणि भारतीय गोलंदाजाला दुखापत झाली आहे.