

India Women vs Zimbabwe Women 2nd T20I
Sakal
India Women Vs Zimbabwe Women, 2nd T20I: भारतीय महिला विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघात दुसरा टी२० सामना रायपूरला सुरू आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार मारा करताना झिम्बाब्वेला १०० धावांसाठीही संघर्ष करायला लावला. त्यामुळे झिम्बाब्वेला भारतासमोर केवळ १०३ धावांचेच लक्ष्य ठेवता आले आहे.
या सामन्यात जर भारताने विजय मिळवला, तर भारत ही मालिकाही खिशात घालेल. पण जर झिम्बाब्वेने भारताला १०२ धावा करण्यापासून रोखले, तर मात्र मालिकेत बरोबरी होईल. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे सध्या मालिकेत भारतीय संघ १-० असा आघाडीवर आहे.