
रविवारी (११ मे) भारतीय महिला संघाने तिरंगी वनडे मालिकेचे विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेत श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशात ही तिरंगी मालिका खेळवण्यात आली होती.
या तिरंगी मालिकेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका महिला संघात रविवारी आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडला. या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला ९७ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू स्नेह राणा ठरली, तर अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू स्मृती मानधना ठरली.