
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात दणक्यात केली आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि अक्षर पटेल फलंदाजीत चमकले.
या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने ३८.४ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केला.