
आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद २०२५ स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने जिंकले आहे. इराणमधील तेहरान येथे ही स्पर्धा गेल्या आठवड्यांपासून सुरू होती. या स्पर्धेत भारतीय महिला संघ गतविजेता म्हणून उतरला होता. त्यांनी गतविजेत्याला शोभेल अशी कामगिरी करत अपराजित राहून विजेतेपद राखले आहे.