INDW vs WIW: अंतिम सामना जिंकत भारताने ODI मालिकेतही दिला वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश; दिप्ती शर्मा, रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर विंडीज फसली

INDW vs WIW ODI series : भारताने वेस्ट इंडिजविरूद्धचा अंतिम सामना ५ विकेट्सने जिंकला व मालिका ३-० च्या फरकाने जिंकली.
INDW vs WIW
INDW vs WIWesakal
Updated on

India Won ODI Series Against West Indies By 3-0 : भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजला ट्वेंटी-२० मालिकेल व्हाईट वॉशनंतर आता वन-डे मालिकेतही व्हाईट वॉश दिला आहे. भारतीय महिला संघाने अंतिम वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजला विकेट्सने पराभूत केले व मालिका ३-० ने जिंकली. दिप्ती शर्माने ६ विकेट्स व रेणुका सिंगने ४ विकेट्स घेत वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर गुंडाळला आणि भारतीय संघाने १६३ धावांचे लक्ष्य २८.२ षटकांत पूर्ण करत सामन्यात बाजी मारली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com