IND vs NZ T20I: भारतीय संघाने विश्वविक्रम रचला! आता तिसरा सामना कधी, कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Where to watch India vs New Zealand 3rd T20I live? भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात शानदार विजय मिळवत विश्वविक्रमाला गवसणी घातली. भारताने न्यूझीलंडवर चार विकेट्सने मात केली आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
India create history with 200 T20I wins after beating New Zealand

India create history with 200 T20I wins after beating New Zealand

Updated on: 

India Set For Another Clash After Historic World Record : तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात भारताला थरारक विजय मिळवून दिला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील आघाडी २-० ने मजबूत केली. १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला चांगली सुरुवात करता आली नाही, परंतु तिलक, नमन धीर आणि नितीश यांनी आक्रमक खेळ करताना संघाला १९.५ षटकांत विजय मिळवून दिला. भारतासाठी हा ऐतिहासिक विजय ठरला आणि जगात असा पराक्रम करणारा भारत हा एकमेव संघ ठरला. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com