Team India WTC Qualification Scenario
Team India WTC Qualification Scenario Sakal

WTC 2025 Final साठी टीम इंडियाचा मार्ग कठीण, पण अशक्य नाही; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

WTC Final Scenarios: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश स्वीकारावा लागल्यानंतर WTC 2023-25 फायनलसाठी मार्ग कठीण झाला आहे. पण तरी अद्याप भारताच्या आशा संपलेल्या नाही. भारतासाठी आणि इतर प्रबळ दावेदारांसाठी कसे समीकरण आहे, जाणून घ्या.
Published on

WTC Final equation after India vs New Zealand Test Series: भारतीय संघावर रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत २५ धावांवर पराभूत व्हावं लागल्याने व्हाईटवॉशची नामुष्की ओढावली. न्यूझीलंड पहिलाच असा संघ ठरला, ज्यांनी भारताला मायदेशात ३-० अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत केलं.

दरम्यान, या लाजीरवाण्या पराभवामुळे भारताचे दुहेरी नुकसान झाले आहे. भारताने मालिका गमावण्याबरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या (WTC 2023-25) पाँइंट्स टेबलमधील अव्वल स्थानही गमावले आहे. त्यामुळे आता भारतीय संघासाठी टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात सलग तिसऱ्यांदा प्रवेश करण्याचा मार्ग कठीण झाला आहे.

भारतीय संघ सध्या ५८.३३ सरासरीसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया सध्या ६२.५० च्या सरासरीसह अव्वल क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंका संघाचे ५५.५६ सरासरी आहे.

न्यूझीलंड भारताविरूद्धच्या विजयामुळे ५४.५५ सरासरीसह चौथ्या क्रमांकावर आहेत, तर पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून त्यांची सरासरी ५४.१७ आहे. त्यामुळे सध्या पहिल्या दोन क्रमांकासाठी हे पाच संघ शर्यतीत आहे.

Team India WTC Qualification Scenario
IND vs NZ: वानखेडेवर Ajaz Patel ने रचला इतिहास; ठरला न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com