

WTC Final Qualification Scenario
esakal
WTC Final Qualification Scenario: भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के करेल का, असा प्रश्न प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात आहे. नेमकं भारतीय संघाला किती सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत काय बदल होऊ शकतात? नेमकं गणित काय आहे?
भारतीय संघाने २०२१ आणि २०२३ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. परंतु, दोन्ही वेळा संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मात्र २०२३-२५ या सत्रात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही.