

U19 Asia Cup 2024, India vs UAE: बुधवारी (४ डिसेंबर) १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) संघात सामना झाला. शारजाहमध्ये झालेला हा सामना भारताने १० विकेट्सने सहज जिंकला. हा भारताचा या स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना होता.
दरम्यान, या सामन्यात यष्टीरक्षक हरवंश सिंगने केलेल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने एमएस धोनी स्टाईलने फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.