Suryakumar Yadav भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याची संधी गमावणार? दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर

Duleep Trophy 2024-25: दुलीप ट्रॉफीमधील पहिल्या फेरीच्या सामन्यामधून सूर्यकुमार यादव बाहेर झाला आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavSakal
Updated on: 

Suryakumar Yadav: भारतीय क्रिकेटमधील नव्या देशांतर्गत हंगामाला ५ सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी गेल्याच महिन्यात चार संघांची घोषणा झाली आहे. पण आता रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्यापाठोपाठ सूर्यकुमार यादवने पहिल्या फेरीतून माघार घेतली आहे.

सूर्यकुमार यादवला त्याच्या हाताच्या दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतून माघार घ्यावी लागली आहे. त्याचा समावेश इंडिया सी संघात होता. त्याला पहिल्या फेरीत इंडिया डी संघाशी सामना खेळायचा होता.

सूर्यकुमारला बुची बाबू स्पर्धेत खेळताना ही दुखापत झाली आहे. मुंबईकडून या स्पर्धेत खेळत असताना टीएनसीए इलेव्हन संघाविरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे त्याला या सामन्याच्या शेवटच्या दिवसाच्या खेळातही सहभागी होता आले नव्हते.

Suryakumar Yadav
अजून किती विश्रांती? रोहित, विराट, जसप्रीत यांच्या Duleep Trophy न खेळण्यावर माजी खेळाडूने आकडेवारीच मांडली
Loading content, please wait...