
भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याचा भाऊ विनोद सेहवाग याला चंदीगढ पोलिसांनी गुरुवारी (६ मार्च) अटक केली होती. त्याला चेक बाऊन्स प्रकरणी ही ताब्यात घेण्यात आले होते. साल २०२३ पासून हे प्रकरण सुरू आहे.
याआधी श्री नैना प्लास्टिकचे मालक कृष्ण मोहन खन्ना यांना देण्यात आलेले चेक बाऊन्स झाले होते. यासंबंधित कार्यवाहीत अनेकदा गैरहजर राहिल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने २०२३ मध्ये विनोद आणि इतर दोघांना दोषी ठरवले होते. त्याच प्रकरणात आता त्याला ताब्यात घेण्यात आले होते.