

Vande Mataram Before National Anthem in IND vs AFG, 1st T20I
Sakal
Vande Mataram Before National Anthem in IND vs AFG, 1st T20I : भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पहिला टी२० सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना ऐतिहासिकही ठरला.
या टी२० मालिकेचे आयोजक अफगाणिस्तान असल्याने भारतीय संघ पहिल्यांदाच घरच्या प्रेक्षकांसमोर पाहुणा म्हणून खेळला. याशिवाय या सामन्यापूर्वी एक ऐतिहासिक घटनाही पाहायला मिळाली. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारताचे राष्ट्रीय गीत राष्ट्रगीताआधी वाजवण्यात आले.
क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच झालं की भारताच्या सामन्यापूर्वी 'वंदे मातरम्' हे 'जन गण मन'च्या आधी वाजवण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच 'वंदे मातरम्' वाजवले गेले.