

Abhishek Sharma | India to Dominant 7-Wicket Win Vs Afghanistan in 1st T20I
Sakal
Afghanistan vs India, 1st T20I Marathi News : भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारताच्या विजयात अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांचं मोठं योगदान राहिलं. दोघांनीही आक्रमक खेळ केला.
या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी १५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघाने अभिषेक आणि ईशान यांच्या १२१ धावांच्या भागीदारीसह १३.१ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.