INDW vs SLW Tri-Series 2025 match: भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्या महिला संघाच्या तिरंगी मालिकेला आजपासून सुरुवात झाली. भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यातला सलामीचा सामना सुरू आहे. पण, पावसामुळे हा सामना ३९-३९ षटकांचा खेळवण्यात आला आहे. भारतीय संघाने आजच्या लढतीत श्री चराणी व काश्वी गौतम यांनी भारताकडून पदार्पण केले.