Suryakumar Yadav Returns, Rohit & Kohli Likely to Rejoin India Squad for AUS
esakal
Rohit Sharma and Virat Kohli comeback : आर पी सिंग आणि प्रग्यान ओझा या निवड समितीत नव्याने दाखल झालेल्या सदस्यांसमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. भारतीय ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्याकरीत भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांना पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्साही आहेत. ऑस्ट्रेलियन्सही भारताचे हे दोन स्टार्स खेळणार आहेत की नाही, याची विचारणा भारतीय पत्रकारांकडे करताना ऐकायला मिळत आहे.