Jasprit Bumrah rested for India vs England second Test
भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २ ते ६ जुलै या कालवाधीत बर्मिंगहॅमच्या एडबस्टन येथे होणार आहे. भारताला एडबस्टन येथे एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही आणि त्यात लीड्सवर पराभव पत्करून हा संघ इथे दाखल होणार आहे. या सामन्यात प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्याची शक्यता बळावली आहे. या दौऱ्यावर येण्यापूर्वीच जस्सीला तीन कसोटीत खेळवले जाईल, हे स्पष्ट केले गेले होते. त्याच्यावरील कामाच्या ताणाचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीतचा बदल निश्चित असताना आणखी एक खेळाडू संघाबाहेर बसू शकतो.