India may make multiple changes for the 4th T20I against South Africa
esakal
India’s Playing XI for 4th T20I vs South Africa: भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असली तरी कर्णधार सूर्यकुमार यादव व शुभमन गिल ( Shubman Gill) यांची खराब कामगिरी चिंतेचे कारण आहे. गिलकडे उप कर्णधारपद दिले गेले आणि त्याच्या एन्ट्रीने संजू सॅमसनला बाकावर बसावे लागले. पण, १७ डिसेंबरला लखनौ येथे होणाऱ्या चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यांत संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. गिलच्या जागी अंतिम अकरामध्ये यष्टिरक्षक-फलंदाज संजूला संधी मिळण्याचा अंदाज आहे.