Shreyas Iyer entered the record books on his T20I captaincy debut for India
esakal
Ireland vs India, 1st T20I Marathi Cricket Updates: वैभव सूर्यवंशीला पदार्पणासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवीन कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हा हा निर्णय सांगितला. संघातील अनुभवी खेळाडूंना घेऊनच वाटचाल करणार असल्याचे संकेत त्याने दिले. त्याचवेळी वैभव अजून लहान आहे आणि त्याच्याकडे वेळ आहे, असेही तो म्हणाला. आता तो रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात पदार्पण करतो का, याकडे लक्ष लागले आहे. सूर्यकुमार यादवकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेत श्रेयसकडे सोपवली गेली आहे आणि पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची ही तयारी आहे.