IND vs SL 1st Test: सर्फराज खानची एन्ट्री, पण नाही मिळणार खेळण्याची संधी! पहिल्या कसोटीसाठी कशी असेल भारताची Playing XI?

India probable playing XI for first Test against Sri Lanka: भारतीय संघामागे लागलेले दुखापतीचे ग्रहण काही केल्या सुटण्याचं नाव घेत नाही... साई सुदर्शनला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि त्याच्याजागी मुंबईच्या सर्फराज खानची संघात निवड झाली. पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा पक्की असेल का?
India probable playing XI for first Test against Sri Lanka

India probable playing XI for first Test against Sri Lanka

ESAKAL

Updated on

IND vs SL first Test India playing XI prediction : भारतीय संघाने तीन दिवसाच्या सराव सामन्यात नाट्यमयरित्या विजय मिळवला... मोहम्मद सिराजने ८ चेंडूंत चौकार-षटकारांचा पाऊस पाडून भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. आता भारतीय संघाची खरी कसोटी सुरू होणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला दुखापतीचा फटका बसलेला आहे आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज साई सुदर्शन यानेही माघार घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने पहिल्या कसोटीला मुकणार आहे. अशात कोलंबो येथे होणाऱ्या कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन ( अंतिम एकादश) कशी असेल याची सर्वांना उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com