India playing XI vs Zimbabwe 1st T20I
esakal
India vs Zimbabwe T20I debut prediction: आयर्लंड व इंग्लंड यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर दाखल झाला आहे. इथे ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे आणि पहिला सामना गुरुवारी हरारे येथे होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला विजयी लय मिळवण्याची ही आयती संधी आहे. पण, झिम्बाब्वेचा सध्याचा फॉर्म पाहता, त्यांना हलक्यात घेण्याची चूक महागात पडू शकते. यासाठीच भारतीय संघ तगडी प्लेइंग इलेव्हन घेऊनच मैदानावर उतरण्याचा अंदाज आहे. पण, काही प्रयोगही झालेले दिसू शकतात आणि चार खेळाडू पदार्पणाच्या शर्यतीत आहेत.