India’s Playing XI in 2nd ODI
esakal
India vs South Africa 2nd ODI : रोहित शर्मा व विराट कोहली या अनुभवी खेळाडूंच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला वन डे सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा वन डे सामना आज रायपूर येथे होणार आहे आणि हा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. पण, या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. भारताच्या अंतिम अकरामध्ये तगडा ऑलराऊंडर आज खेळताना दिसू शकतो.