INDIA’S PROBABLE PLAYING XI FOR 3RD ODI VS SOUTH AFRICA
esakal
India Considering Major Shuffle for 3rd ODI Against South Africa: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली वन डे मालिका निर्णायक वळणावर आली आहे. आफ्रिकेने दुसरा वन डे सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आणि त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. हा सामना शनिवारी विशाखापट्टणम येथे होणार आहे. त्यासाठी भारताने कंबर कसली आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल निश्चित मानला जात आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja) बाकावर बसवण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी आशिया चषक गाजवणाऱ्या हिरोचा समावेश केला जाण्याचा अंदाज आहे.