WI vs ZIM : वेस्ट इंडिज-झिम्बाब्वे लढतीचा निकाल टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; सूर्याचा संघ Semi Final च्या शर्यतीतून बाहेर होणार

WI vs ZIM match impact on India semi final chances: वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्याचा निकाल टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा आता इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहिल्या आहेत. गुणतालिका, नेट रन रेट आणि विविध गणिते यामुळे स्पर्धेतील चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
WI vs ZIM match impact on India semi final chances

WI vs ZIM match impact on India semi final chances

esakal

Updated on

India qualification scenario after West Indies vs Zimbabwe: यजमान भारतीय संघावर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद होण्याचे संकट ओढावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर ८ लढतीत भारताचा दारूण पराभव झाला... हा नुसता पराभव नव्हता, तर टीम इंडियाच्या जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराला धक्का देणारा निकाल आहे. या एका पराभवामुळे टीम इंडिया उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यात आज वानखेडे स्टेडियमवर होणारा वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे सामना निर्णायक ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com