

Manav Suthar
Sakal
भारतीय संघाने नुकतेच अफगाणिस्तानविरुद्ध मुल्लनपूरला झालेल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ३०० धावांनी मोठा विजय मिळवला. हा कसोटीतील भारताचा सर्वात मोठा विजय ठरला. भारताच्या विजयात २३ वर्षीय मानव सुतारने (Manav Suthar) मोठा वाटा उचलला. विशेष म्हणजे त्याच्यासाठी हे त्याचे कसोटी पदार्पण होते.
त्याच्यासमोर विश्रांतीवर असलेल्या रवींद्र जडेजाची जागा भरून काढण्याचं आव्हान होतं. पण त्याने हे आव्हान यशस्वीरित्या तर पेललेच, पण त्याने सामनावीर पुरस्कारही पटकावला.
पदार्पणाच्या सामन्यात सामनावीर होणारा तो मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या या खेळामुळे त्याने सर्वांचे लक्षही वेधले. त्यामुळेच आता त्याला इंग्लंडमध्ये त्याची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.