GAUTAM GAMBHIR’S EXPERIMENTS BACKFIRE, SECOND CONSECUTIVE HOME WHITEWASH
esakal
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( WTC ) गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेने भारतात येऊन यजमानांचे कसोटी मालिकेत वस्त्रहरण केले. भारतीय संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत आणखी एक लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कार्यकाळातील हा दुसरा व्हाईटवॉश ठरला. कोलकाता कसोटी तीन दिवसात संपली अन् गुवाहाटीतही आफ्रिकेने पाचही दिवस वर्चस्व गाजवले. या निकालानंतर गंभीरच्या नावाने नाराजीचे नारे लावताना चाहते दिसले, इतकेच नव्हे तर सोशल मीडियावरही गौतम आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांचे वाभाडे काढले जात आहेत. भारतीय संघाच्या या अशा कामगिरीचे उत्तरदायित्व या दोघांचेच आहे. तसे प्रश्न गुवाहाटी कसोटीनंतर गंभीरला विचारलेही गेले आणि त्याने मोठ्या माजात उत्तरही दिले.