टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला! Mumbai Indians स्टारने इतिहास रचला, जगातील पहिला असा संघ ज्याने...

highest successful run chase in women ODI history: महिला वनडे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली असून भारतीय संघाचा मोठा रेकॉर्ड अखेर मोडला गेला आहे. न्यूझीलंडच्या अमेलिया केर हिने शानदार कामगिरी करत संघाला इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी रन चेस पूर्ण करून दिला.
Amelia Kerr

Amelia Kerr

Updated on: 

New Zealand women vs South Africa women world record match: अमेलिया केर ( Amelia Kerr) च्या रेकॉर्ड ब्रेकिंग खेळीने न्यूझीलंड महिला संघाच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला गेला. न्यूझीलंड संघाने वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३४७ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. महिला वन डे क्रिकेटमधील हा सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला. यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. यजमान न्यूझीलंडने दुसऱ्या वन डे सामन्यांत दोन विकेट्स व दोन चेंडू राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली. मालिकेतील शेवटचा व निर्णायक सामना ४ एप्रिलला वेलिंग्टन येथेच होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com