
पहिला वहिला खो-खो वर्ल्ड कप नुकताच दिल्लीमध्ये पार पडला. या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने रविवारी (१९ जानेवारी) विजेतेपदाला गवसणी घातली आहे. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात नेपाळला ७८-४० फरकाने पराभवाचा धक्का दिला. यासह भारतीय संघाने पहिलाच वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.
मुळची महाराष्ट्रातील बीडची असलेल्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच या सामन्यात वर्चस्व ठेवले होत. त्यांनी नेपाळला कोणत्याही क्षणी पुनरागमनाची संधी दिली नाही.
अंतिम सामन्यात भारतीय संघाचा चपळ खेळ पुन्हा दिसून आला. महिला संघाने सांघिक कामगिरी आणि अचूक रणनीतीमुळे नेपाळला पराभवाचा धक्का दिला. चपळाई, अचूकता आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय खेळाडूंनी या सामन्यात एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलं होतं. भारताच्या या विजयाचे देशभरातून कौतुक होत आहे.