

India Women Test Team
Sakal
IND vs AUS, Day-Night Test: भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. हा दौरा आत्तापर्यंत त्यांच्यासाठी संमिश्र ठरला आहे. या दौऱ्यात टी२० मालिका जिंकल्यानंतर वनडे मालिकेत मात्र भारतीय संघाला व्हाईटवॉशचा सामना करावा लागला.
आता या मर्यादीत षटकांच्या मालिकांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या महिला क्रिकेट संघांमध्ये एकमेव कसोटी सामना शुक्रवारी (६ फेब्रुवारी) सुरू होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना (Day-Night Test) असेल. या सामन्याने भारतीय संघ या दौऱ्याचा शेवट करेल.