Vaibhav Suryavanshi’s Monster Hook Shot Leaves SA Commentator Speechless
esakal
SA commentator reaction on Vaibhav Suryavanshi six : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशनी १९ वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. आफ्रिकेच्या २४६ धावांचा पाठलाग करताना वैभवने ६८ धावांची खेळी केली. त्याने २४ चेंडूंत १ चौकार व १० उत्तुंग षटकार खेचले. वैभवच्या आक्रमक सुरूवातीने भारताला धावांचा पाठलाग करताना आघाडीवर ठेवले आणि त्याची फटकेबाजी पाहून आफ्रिकन समालोचकही स्तब्ध झाले. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ८ विकेट्स व २१ चेंडू राखून दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवला.