
Indian Women Highest ODI Score: भारतीय महिला संघाने वन डे क्रिकेटमधील आतापर्यंच्या सर्वोत्तम धावसंख्येची नोंद बुधवारी केली. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयर्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी २३३ धावांची भागीदारी करताना विक्रम नोंदवला. त्यात स्मृतीने भारताकडून वन डे क्रिकेटमधील वेगवान शतकाची नोंद केली. महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या संघांनंतर चारशेपार धावा करणारा भारत हा तिसरा संघ ठरला आहे.