
Indian Womens Team Historic Win Against Ireland : भारतीय महिला संघाने आयर्लंडविरूद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात विक्रमी विजय मिळवला. भारताने हा सामना ३०४ धावांनी जिंकला आणि आयर्लंडला मालिकेत ३-० व्हाईटवॉश केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडविरूद्ध विक्रमी धावसंख्या उभारली. भारतीय संघाने आत्तापर्यंतच्या सर्वाधिक ४३५ वन-डे धावा केल्या. यामध्ये सलामीवर प्रतिका रावलने दीडशतकी खेळी केली, तर कर्णधार स्मृती मानधनाने शतकी खेळी केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली आणि भारताने अयर्लंडसमोर विजयासाठी ४३६ धावांचे लक्ष्य ठेवले.