Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

INDW vs SA W World Cup Final Marathi Cricket News: महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार सुरुवात केली. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अमनजोत कौरने अफलातून थ्रो मारत ताझमिन ब्रिट्सला धावचीत केले.
Amanjot Kaur pulled off a stunning direct hit to dismiss Tazmin Brits

Amanjot Kaur pulled off a stunning direct hit to dismiss Tazmin Brits

ESAKAL

Updated on

India Women vs South Africa Women Final Marathi Cricket News : भारतीय संघाच्या २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलव्हार्ट व तंझीम ब्रिट्स यांनी सावध, पण सकारात्मक सुरुवात केली. पण, १०व्या षटकात अमनजोत कौरच्या ( Amanjot Kaur ) अप्रतिम थ्रोने दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम केला. एक धाव घेण्यासाठी ब्रिट्सने घेतलेला वळसा, भारताच्या पथ्यावर पडला. त्यानंतर श्री चरणीने १२व्या षटकात एनेके बॉशला भोपळ्यावर पायचीत करून आफ्रिकेवर दडपण निर्माण केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com