Shafali Verma and Harmanpreet Kaur
India Women vs Zimbabwe Women, 3rd T20 Marathi Cricket Update: शफाली वर्मा व हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकांनी भारताला तिसऱ्या ट्वेंटी-२०त झिम्बाब्वेविरुद्ध तगडे लक्ष्य उभे करून दिले. भारताने ही मालिका आधीच खिशात घातली होती आणि त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत प्रयोग पाहायला मिळाले. सलामीला येणारी स्मृती मानधना संपूर्ण सामन्यात फलंदाजीला आली नाही. अनुष्का शर्माला सलामीची संधी मिळाली आणि तिनेही चांगली सुरुवात करून दिली. माजी कर्णधार हरमनप्रीतचे शतक थोडक्यात हुकले.