Smriti Mandhana fastest ODI fifty against Australia
esakal
India women cricket team concede 400 runs for first time : भारतीय महिला संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. पण, आज सुरू असलेल्या तिसऱ्या व निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना वर्ल्ड कप विनर का म्हणतात हे दाखवून दिले. ऑसींनी ४१२ धावांचा डोंगर उभा केला. भारतीय महिला संघाविरुद्ध प्रथमच एखाद्या संघाने चारशेपार धावा केल्या आहेत. मात्र, या धावांचा डोंगर सर करण्यासाठी स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) कंबर कसली आहे. तिने भारताकडून वन डे क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक आज झळकावले. Fastest ODI Hundred for India