IPL 2027 Trade: रिषभ पंतला पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये आणण्यात 'दोन' मोठ्या व्यक्तींचा हात; KKR ही होते मैदानात, पण LSGच्या हट्टामुळे Deal फिसकटली

Rishabh Pant return to Delhi Capitals IPL 2027: आयपीएल २०२७ पूर्वी रिषभ पंतच्या संभाव्य ट्रेडची चर्चा क्रिकेटविश्वात जोरात सुरू आहे. विविध अहवालांनुसार, लखनौ सुपर जायंट्समधून दिल्ली कॅपिटल्समध्ये पंतच्या पुनरागमनामागे दोन दिग्गज व्यक्तींची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
Rishabh Pant return to Delhi Capitals IPL 2027

Rishabh Pant return to Delhi Capitals IPL 2027

esakal

Updated on

Biggest IPL 2027 trade rumors explained: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ ची पहिली ट्रेड समोर आली आहे... लखनौ सुपर जायंट्स रिषभ पंतला रिलीज करण्यास तयार झाले असून तो स्वगृही म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात परतणार आहे. रिषभला आपल्या संघात घेण्यासाठी DC ने कुलदीप यादवला LSG ला देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. पण, रिषभला संघात घेण्यासाठी दिल्लीकडे पुरेसे पैसे नव्हते. रिषभ हा आयपीएल इतिहासातील सर्वात ( २७ कोटी) महागडा खेळाडू आहे, परंतु त्यानेही DC त परतण्यासाठी त्याची रक्कम १५ कोटींपर्यंत आणल्याचे वृ्त्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com