Hardik Pandya: इच्छा असूनही Mumbai Indians हार्दिकला डच्चू देऊ शकत नाही... जाणून घ्या MI फ्रँचायझीची कोंडी झालेली Inside Story

Hardik Pandya trade rumours latest news: हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्समधील भवितव्याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्स किंवा कोलकाता नाईट रायडर्सकडे त्याचा ट्रेड होणार असल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली होती.
Hardik Pandya

Hardik Pandya

sakal

Updated on

Mumbai Indians on Hardik Pandya trade: इंडियन प्रीमिअर लीगमधील अपयशी कामगिरीमुळे मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवणार असल्याची चर्चा सुरू आहे.. ही चर्चा इथेच थांबत नाही, तर त्याला संघातूनच काढण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स या दोन फ्रँचायझींनी कंबर कसल्याचे वृत्त आले आहे. या सर्व चर्चा सुरू असताना MI फ्रँचायझीला इच्छा असूनही हार्दिकला संघाबाहेर करता येणार नाही, अशी Inside Story समोर आली आहे. मुंबई इंडियन्सच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हार्दिकच्या ट्रेडच्या बातम्या हा अफवा आहेत आणि असे काहीच घडणार नसल्याचे सांगण्यात येतेय. पण, यामागे कारण वेगळे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com