
सोमवारी (२४ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात खेळवला जात आहे. विशाखापट्टणमला होत असलेल्या या सामन्यात लखनौने दिल्लीसमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
लखनौकडून मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी वादळी खेळी केली. दोन्ही संघांचा हा या हंगामातील पहिलाच सामना आहे. त्यामुळे या सामन्याने दोन्ही संघ आपल्या मोहिमेची सुरुवात करत आहेत.