Dale Steyn Predicts Historic 300-Run Innings in IPL 2025 : रविवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात हैदराबादने राजस्थानपुढे २८६ धावांचं लक्ष ठेवत सर्वांचे लक्ष वेधलं होतं. या कामगिरीनंतर आता टी-२० सामन्यातही ३०० धावांचा टप्पा पार होईल का, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे. याबाबत आता दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेननही मोठं भाकीत केलं आहे.