
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सला रविवारी (४ मे) पंजाब किंग्सविरुद्ध ३७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौचा हा ११ सामन्यांतील ६ वा पराभव आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आता प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग कठीण झाला आहे. दरम्यान, लखनौला या सामन्यात रिषभ पंतच्या अपयशाचीही चिंता सतावत आहे.