
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत युवा खेळाडूंनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. त्यातही १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्याने वयाच्या १४ व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करताना आयपीएलमधील सर्वात युवा खेळाडू ठरण्याचा विक्रम केला.
इतकेच नाही, तर पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सर्वांनाच चकीत केले. तो इतक्यावरच थांबला नाही, तर गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने ३५ चेंडूतच शतक ठोकले. त्यामुळे तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू ठरला आणि आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय खेळाडूही बनला.