
गुरुवारी (२७ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात खेळवला जात आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला २०० धावांच्या आत रोखण्यात लखनौ सुपर जायंट्सला यश मिळाले आहे.
हैदराबादने लखनौसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात शार्दुल ठाकूर आणि प्रिन्स यादव लखनौसाठी चमकले आहेत. त्यांनी किफायतशीर गोलंदाजी केली.