
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील सातव्या सामन्यात गुरुवारी (२७ मार्च) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमने - सामने आहेत. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. हे मैदान गेल्या दोन वर्षात टी२० मध्ये तरी फलंदाजांना पोषक ठरताना दिसत आहे.
या मैदानात गेल्या काही टी२० सामन्यात २०० धावांचाही टप्पा अनेकदा पार झाला आहे. त्यातही आक्रमक फलंदाजी ताकद असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे हे घरचे मैदान आहे. त्यांनी आयपीएल २०२५ च्या पहिल्याच सामन्यात २८६ धावांचा टप्पा गाठला होता. यासाठी इशान किशनने शतक झळकावत मोलाचे योगदान दिले होते.