IPL 2026 AUCTION LIKELY AROUND DECEMBER 15, RETENTION DEADLINE NOVEMBER 15; CSK TO RELEASE FIVE PLAYERS
esakal
आयपीएल २०२६ चा लिलाव कुठे होणार याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी तो भारतात होऊ शकतो.
मागील दोन लिलाव दुबई (२०२३) व सौदी अरेबिया (२०२४) येथे झाले होते.
आर. अश्विनच्या निवृत्तीमुळे सीएसकेच्या पर्समध्ये ९.७५ कोटी रुपये वाढले आहेत.
इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लिलावाची तारीख समोर आली आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच १३ ते १५ तारखेला हा लिलाव पार पडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. लिलावा संदर्भात फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार तारखा जाहीर केल्या जातील. आयपीएल २०२६ पूर्वी बऱ्याच फ्रँचायझी त्यांच्या संघात बदल करण्यासाठी तयार आहेत आणि सर्वांचे लक्ष चेन्नई सुपर किंग्सच्या रणनितीवर असणार आहे.