IPL 2026 AUCTION : पहिल्या सेटमध्येच कल्ला; पृथ्वी शॉ, सर्फराज खानचा समावेश असलेल्या यादीत ऑस्ट्रेलियन मोठी रक्कम घेऊन जाणार

IPL 2026 Auction Set Revealed : लिलावाचा पहिलाच सेट यंदा मोठा 'ब्लॉकबस्टर' ठरणार आहे. कारण या सेटमध्येच काही विकेट उडवणारी नावं समोर आली आहेत. कॅमरून ग्रीन, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, पृथ्वी शॉ, सर्फराज खान आणि डेव्हिड मिलर यांचा या सेटमध्ये समावेश आहे.
IPL 2026 First Auction Set Revealed

IPL 2026 First Auction Set Revealed

esakal

Updated on

IPL 2026 first auction set player list : कोलकात नाइट रायडर्स सर्वाधिक ६४.३ कोटींची रक्कम खिशात घेऊन इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठीच्या लिलावात येणार आहेत. १६ डिसेंबरला अबु धाबी येथे लिलाव होणार आहे आणि त्यासाठी ३५० खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयने आज जाहीर केली. KKR पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सकडे सर्वाधिक ४३.४ कोटी रक्कम शिल्लक आहे आणि लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तगड्या खेळाडूसाठी हे दोन्ही संघ खिसा निम्मा रिकामी करण्याची शक्यता आहे. आयपीएल लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि सर्फराज खान ( Sarfaraz Khan) या भारतीय खेळाडूंचेही नाव आहे. त्यांचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील फॉर्म पाहता फ्रँचायझी यांना आपल्या ताफ्यात नक्की घेण्यासाठी प्रयत्न करतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com